कर्जत प्रतिनिधी. तालुक्यातील आदर्श शाल म्हणून ओळख असलेली झुगरे वाडी, समजली जाते, शाळेत पर्यावरण पूरक प्रवेशुस्तव साजरा करण्यात आला. तालुक्यात तापमान मध्ये खूप मोठी वाढ निर्माण झाली असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा झुगरे वाडी शाळेत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी ऑक्सिजन व सावली देणाऱ्या वडाच्या २० झाडांची लागवड पालक व विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामुळे शाळेत कार्यरत असलेल्या पर्यावरण क्लब च्या माध्यमातून या झाडांच्या संवर्धनासाठी लक्ष दिले जाणार आहे.
शाळेत पाहिले पाऊल ठेवत असताना विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाणीव व्हावी म्हणून या साठी यांच्या हस्ते तसेच पालकांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. या वर्षी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेऊन दाखल झालेल्या २० विद्यार्थी आणि पालक यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी बोलावून त्यांचा हस्ते झाडे लावण्यात आली. तसेच त्यांना झाडांची रोपे देण्यात आली, आपल्या शेताच्या बांधावर, जागेत, अंगणात, झाडे लावा व त्यांचं संवर्धन करणे गरजेचे आहे..

Post a Comment
0 Comments