Type Here to Get Search Results !

आरटीई प्रवेशावरून पालक सैरभैर ! विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यायचा की वाट पहायची यावर संभ्रम....

 

प्रतिनिधी ( प्रफुल जाधव); राज्यातील लाखो पालक आरटीई प्रवेशाची वाट पाहत आहेत. परंतु आरटीई प्रवेशाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे. त्यामुळे पालक सैरभैर झाले असून शालांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा तर आरटीई मध्ये प्रवेश मिळाला तर काय करायचे असा प्रश्न पालकांना सतावत आहे. त्यामुळे शाळांमध्ये प्रवेश घ्यावा की आरटीई प्रवेशाच्या निकालाची वाट पहावी !असा मोठा गंभीर प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.

    आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील ९ हजार २१७  शाळांमधील १ लाख ५ हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आले आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढली आहे. परंतु या प्रकरणी न्यायालयात सुनवानी सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जात शाळांनी जुलैला या संदर्भात अंतिम सुनवाणी घेण्यात येणार आहे त्यानंतर 12 जुलैपासून पुढील प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
  शालांकडून केवल अडवणूक ; शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयात १३९ शालानी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने त्यांना प्रवेश प्रक्रिया कधी सुरू झाली? किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे? त्यांचे किती शुल्क घेतले? याची माहिती शिक्षण संचालना कडे देण्यास सांगितले आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने सोमवारी संबंधित शालांकडे माहिती मागविली आहे. याचिका दाखल केलेल्या अनेक शाला अल्पसंख्यांक आहेत. त्यांना आरटीई नियम लागू नाहीत असे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित शाळा केवळ पालका ंची आडवणूक करण्यासाठी न्यायालयात गेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.            शरद गोसावी;- संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय. आरटीई प्रवेश प्रक्रिया संदर्भात 11 जुलै रोजी अंतिम सुनावणी होऊन निर्णय होईल त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 12 जुलै पासून पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.

Post a Comment

0 Comments