Type Here to Get Search Results !

संघटनेच्या प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे यांचा वाढदिसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर....


 कर्जत प्रतिनिधी. दि.२३ जुलै २०२४ रविवार. अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली. महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कर्जत येथे प्रदेश कमिटी अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

       चींचवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भानसोली आदिवासी वाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याच वेळी प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व रायगड जिल्हा युवक अध्यक्ष यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तर सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे ठाणे उपाध्यक्ष विशाल बनसोडे यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    या कार्यक्रमात साधारण पणे ६० ते ६५ नागरिकांनी सहभाग घेतला, त्यामध्ये इसिजी, बिपी, शुगर, कॉलेस्ट्रॉल, रक्तातील चाचण्या, डोळे चेकअप, व मोफत चष्मा, मोफत औषधे, डायबेटिस, सामान्य चाचण्या ताप, थंडी, सर्दी, खोकला, गुडघे दुखी, ई. शिबिरात करण्यात आले. तसेच अन्य ४ ज्येष्ठ महिलांना पुढील उपचारासाठी आयुर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल कल्याण येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. यावेळी डॉ. प्रियांका पावसे, व ४ सहकारी, डॉ. विशाल बनसोडे, माजी सरपंच श्री द्वारकानाथ बोराडे, ग्रामपंचायत सदस्य उमेश भोईर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव, कर्जत सेल उपाध्यक्ष कैलाश पवार, कर्जत तालुका सदस्य संतोष पवार, ई या कार्यक्रमास उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments