कर्जत माथेरान.. (प्रफुल जाधव):. माथेरान थंड हवेच्या ठिकाणी अभूतपूर्व गर्दी झाली आहे. यामध्ये सलग सुट्ट्या आणि उन्हाळी पर्यटन उन्हाळी पर्यटन हंगामातील शेवटचा विकेंड साजरा करण्यासाठी साजरा करण्यासाठी तब्बल पन्नास हजार पर्यटक दाखल झाले आहेत.
दरम्यान पर्यटकांच्या गर्दीमुळे माथेरान मधील सर्व प्रेक्षणीय स्थळे, माथेरान बाजारपेठ, माथेरान नेरळ घाट रस्ता, ई रिक्षा, आणि हॉटेल, लॉज रेस्टॉरंट, देखील हाउसफुल झाले आहेत. यंदाच्या पर्यटन हंगामातील सर्वाधिक गर्दीचा असा हा विकेंट ठरला आहे. मान्सून पाऊस सुरू होण्याची वाट सर्व पाहत असून वातावरण निर्माण झालेला उष्मा या मुळे माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. त्यात सलग सुट्ट्यांमुळे माथेरान शुक्रवारपासून झाले आहे. शनिवार माथेरान मध्ये पर्यटकांच्या गर्दी चे लोंढे ओसंडून वाहत असताना माथेरान मध्ये येणारी पावसाची सर या मुले पर्यटक आणखी आनंदले आहेत.
पॉईंटवर पर्यटकांची गर्दी, पहिल्यांदाच माथेरान झोपले नसलेले दिसून आले. पर्यटकांच्या सेवेसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट यांच्या कडे देखील पर्यटकांच्या रांगा दिसून आल्या तर माथेरान शहरातील सर्वात प्रेक्षणीय स्थळ पॉइंट येथे पर्यटक गर्दी करत होते, सकाळचा सूर्य पाहण्यासाठी अलेक्झांडर पॉइंट, खंडाळा पॉइंट, पॅनेरा पॉइंट, येथे सकाळी पर्यटक गर्दी करून होते. या साठी पर्यटकांनी घोडे आधीच बुक करून ठेवले होते. पर्यटकां साठी प्रेक्षणीय पॉइंट मध्ये सर्वाधिक एको पॉइंट येथे जास्त संख्येने पर्यटक होते.

Post a Comment
0 Comments