Type Here to Get Search Results !

मुरबाड कलम रोड, रस्त्यावर सिलेंडर टेम्पोचा रिक्षाला धडक !


 कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव): नेरल मुरबाड रस्त्यावर कळंब जवळील पोही फाटा येथे गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पो ने प्रवासी रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, या अपघातात तिघे जखमी झाले आहेत.

        या अपघातात जबाबदार असल्याबद्दल टेम्पो चालक अमर राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब येथील प्रवासी रिक्षा सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती, साडेआठ वाजण्याच्या सुमारास पनवेल कडून कर्जत रस्त्याने शहापूर कडे निघाली. टाटा अल्ट्रा टेम्पो ने रिक्षाला धडक देत रिक्षाला आवडत नेली. प्रवासी रिक्षाचे मालक यशवंत परशुराम डोंगरे हे प्रवाशांना घेऊन निघाले होते त्यांच्या प्रवासी रिक्शाला गॅस सिलेंडर ने भरलेल्या टेम्पो ने धडक दिली असून या धडकेत रिक्षा खांबावर जाऊन आदळली. टेम्पो चालक अमर राठोड याने भरधाव व वेगाने आणि रस्त्यातील तीन चौक लक्षात न घेता ऐकत करीत वाहन चालविल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातास कारणीभूत असलेले टेम्पो वर अपघाताची जबाबदारी टाकण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

    भरदा वेगाने व चालकाचे नियंत्रण सुटले, नेरळ दिशेला जात असणाऱ्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यावेळी रिक्षा मधील दोन प्रवासी सुदैवाने बचावले कोणतीही जीवित हानी झाली नसून प्रवासी व रिक्षाचालक यांना किरकोळ दुखापत झाली आहे. रिक्षाचा चक्काचूर झाला आहे, व अपघातानंतर गॅस सिलेंडर वाहून नेणारी गाडी पोलिसांनी कळंब आऊट पोस्ट येथे ठेवली आहे. टेम्पो चालक अमर राठोड बदलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments