कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव); नेरळ पोशिर रस्त्यावरील मालेगाव च्या हद्दीतील एका टेम्पो मधून तीन गोवंशीय जनावरांची तस्करी सुरू होती. नेरळ पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापला रचून तो टेम्पो आणि टेम्पो मधील तीन गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी टेम्पो सह तब्बल अडीच लाखांचा माळ जप्त केला आहे. चिकन पाडा माले रस्त्यावर गोवंशीय जनावरांची तस्करी करण्यात येणार आहे असल्याची माहिती नेरळ पोलीस यांना मिळाल्यामुळे त्यानुसार 11 जून सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी मौजे मालेगावचे हद्दीत हा टेम्पो गोवंशीय जनावरे घेऊन जाणार आहे या माहितीनुसार नेरूळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवले यांनी पोलिसांची एक टीम तयार केली आणि सापळा रचला.
पोलिसांच्या झाडीमध्ये टेम्पो आणि टेम्पो चालक तसेच गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. गाडीचा चालक यासीन युनिस सुरमे हा चिकन पाडा येथील राहणारा असून त्याची चौकशी केली असता गाडीतील गोवंशीय जनावरे त्यांनी चोरून आणलेली आहेत व कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेल्या तीन जनावरे यांची रवानगी नेरळ कोमल वाडी येथील गोशाळेत करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस हवालदार नवनाथ मात्रे व अन्य पोलीस कर्मचारी यांनी केली. सदर गुन्ह्याची नोंद नेरूळ पोलीस ठाणे येथे १३२/२०२४ प्रमाणे झाली आहे. नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने कारवाई करताना गोवंशीय जनावरांचे कत्तली पासून संरक्षण केले आहे.

Post a Comment
0 Comments