माशाच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका...
June 16, 2024
0
खोपोली. प्रतिनिधी ; खोपोली शहरातील कृष्णनगर परिसरात शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत अजगर जातीचा साप मासे पकडणाऱ्याच्या जाळ्यात गुरफटून गेल्याची घटना घडली. तेथील रहिवासी तौफिक शेख यांच्या निदर्शनात आली प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी माहिती घेताच अजगर मासे पकडण्याच्या झाल्या मध्ये पूर्णपणे अडकल्याचे त्यांना दिसून आले. तो अजगर बरेच दिवस त्या अवस्थेत असल्याने त्याच्या शरीराला काही कीटक देखील चिटकले होते अशा कीटक अवस्थेतून अजगराला लवकरात लवकर मोकळे करणे गरजेचे असल्याने सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी व अमोल ठकेकर यांच्या मदतीने सावधानता बालगत अजगराला पकडून त्याला कोणतीही इच्छा होणार नाही त्याची काळजी घेत संकट मुक्त केले. साधारणपणे ९ फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला अजगर पक्ष शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडणाऱ्याच्या झाल्यात अडकून पडला होता.

Post a Comment
0 Comments