कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; कर्जत तालुका हा निसर्गमुक्त सौंदर्याची उधळण केलेला प्रदूषण मुक्त भूप्रदेश ,आंब्याच्या वस्ती ,असलेली दमदार गावे ऐतिहासिक, परंपरा असलेले किल्ले व दुर्ग वस्तू कलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जागृत देवस्थाने सह्याद्रीच्या कुशीतील ,थंड हवेची ठिकाणे ,सांस्कृतिक व पौराणिक वारसा लोककला, कोकणी जेवण हे सर्व प्रकार कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतात.
कडाव येथील बाल दिगंबर मंदिर, वेणगाव येथील महालक्ष्मी मंदिर, अशाने ( डिकसल)येथिल धबधबा, पलसदरी येथील स्वामी समर्थ महाराज मठ प्रसिद्ध आहे.
कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आमदार झाल्यावर कर्जतची सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून कर्जतचे जे शुशोभिकरन झाले त्यात अजून भर पडली असून कर्जत शहराच्या सुरवातीलाच एक भले मोठे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचं असलेले प्रवेशद्वार तसेच श्री राम पुलाच्या येथे नगर सेवक संकेत भासे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रती पंढरपूर व तेथील विठ्ठलाची ती ५२ फूट उंच अशी देखणी मूर्ती जिच्या कडे बघून मन भरून येतं.
तालुक्यातील पेठचा किल्ला, बुद्धकालीन कोंढाणे लेणी, थंड हवेचे ठिकाण पर्यटन स्थळ माथेरान, मिनी ट्रेन, उंचावरून कोसळणारे दुधाळ धबधबे, सगळीकडे पसरलेली हिरवीगार शेती, झाडे, ही पर्यटनाच्या आकर्षणाची ठिकाणे आहेत. परंतु याच कर्जतच्या सौदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी मुबई पुणे येथून पावसाळ्यात हजारो पर्यटक येत असतात. परंतु पावसाळ्यात पर्यटन स्थली कोणताही अनुसुचीत प्रकार घडू नये म्हणून शासन दरवर्षी कलम १४४ लागू करते, इच्छा असून सुध्दा येथे पर्यटकांना पावसाळ्यात निराश होऊन मागे जावे लागते. या बंदी मुले कर्जतच्या व्यावसाईकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे ह्या वर्षी स्वतः आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी पुढाकार घेऊन कर्जत तालुक्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांवर १४४ कलम लागू करण्यात येऊ नये अशी मागणी तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कडे केली आहे. या मुळे स्थानिक व्यावसायिकांनी आमदार थोरवे साहेबांचे आभार मानले आहेत...

Post a Comment
0 Comments