Type Here to Get Search Results !

अमृता राजू झुगरे आदिवासी विद्यार्थीनी १२ वी सायन्स मधून ८३;६७ टक्के गुण मिळवून प्रथम...

 


प्रतिनिधी (मोतीराम पादिर) ; कर्जत तालुक्यातील नेरळ मोहाची वाडी येथे राहणारी अमृता राजू झुगरे नेरळ विद्यामंदिर माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय नेरळ येथे बारावी सायन्स शाखेत शिक्षण घेत असताना सन २०२३-२०२४ शैक्षणिक वर्षात बारावी सायन्स मध्ये ८३:६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिचे आई वडील व अमृता झुगरे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

     नेरळ विद्या मंदिर माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय नेरळ  सन २०२३-२०२४ या शैशनिक वर्षात बारावी सायन्स शाखेतून परीक्षा देत असताना  आपल्या हुशार, जिद्द व मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून अमृता झुगरे बारावी सायन्स मधून ८३;६७ टक्के गुण मिळवत आपल्या कॉलेजचे व आई वडिलांचे नाव उज्वल केले. आमृता ही पहिल्यापासून हुशार व मेहनती असून तिला अभिनय व ड्रॉइंग ची आवड आहे. तसेच २०२२ मध्ये कर्जत तालुक्यात दहाविमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनमधून पहिली आली होती.

    आमृता यांना पुढील शिक्षण मेडिकल मधून करीयर करायचे आहे. अमृता यांना आई व वडील नातेवाईक मित्रांकडून अभिनंदन व शुभेछ्या दिल्या जात आहेत...

Post a Comment

0 Comments