Type Here to Get Search Results !

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या कडून तब्बल ४३ ठिकाणी टँकर ने पुरविले जाते पिण्याचे पाणी...


 कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) : कर्जत तालुक्यात यावर्षी ग्रामीण भागात व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या तालुक्यात शासनाच्या वतीने ३० गावे व वाड्या या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकरच्या साहाय्याने पुरविले जात आहे.त्या नंतरही शासनाच्या यादी मध्ये टंचाई ग्रस्त गावांना या यादीत समावेश नसल्याने अनेक गावे व वाड्या यांना शासनाचे टँकर पाठवता  येत नाही.

       कर्जत तालुक्यात या वर्षी देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पाणी टंचाई  वर मात करण्यासाठी काही भागात खाजगी तत्वावर देखील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत


       शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकाराने तब्बल ४३ ठिकाणी टँकर पाठऊन पिण्याचे पाणी उपलब्ध केले जात आहे. काही ठिकाणी आदिवासी भागात तर काही ठिकाणी गावे, मोठ्या प्रमाणात सोसायट्या यांना पाण्याचे टँकर पुरविले जात आहेत.

      मागील वर्षी देखील उपजिल्हा प्रमुख सावंत साहेबांनी अनेक ठिकाणी गावात व आदिवासी भागात  स्व खर्चाने बोअरवेल मारून दिल्या आहेत. त्याच प्रमाणे अनेक वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करून तहान भागवली आहे. या वर्षी उन्हाळा अधिक तीव्र असल्यामुळे तापमानात खूप वाढ निर्माण झाली आहे. या मुळे पाणी टंचाईचे संकट अनेक ठिकाणी गावांना पसरले आहे. त्यामुळे पाणी टंचाई ने सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सर्व सामान्य जनतेची समस्या सोडविण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कंबर कसली आहे.

   या टंचाई चा सामना आत्ता पर्यंत ४३ ठिकाणी बसत असताना उपजिल्हा प्रमुख यांच्या वतीने खालील गावे व वाड्या यांना पाणी पुरविले जात आहे, या मध्ये मिरचुलवाडी, कळंब, बोरीचीवाडी, दिवालवाडी, कुंभाराआली, पदिरर्वाडी, मेंगालवाडी, टेपाचीवाडी, झुगरेवाडी, वडाचीवाडी, चाफेवाडी, पेटारवाडी, बोडसेत, पेंढरी, कोतवालवाडी, पाचखवाडी, हर्याची वाडी, जांभूळवाडी, फणसवाडी, पिंगलस, काटेवाडी, अंभेर पाडा, ओलमन, धनगरवाडा, नवसुचीवाडी, करकुलवाडी, गुढवन, आशानेवाडी, खांदन, धामणी, भक्ताची वाडी, मोग्रज, उक्रुल, समृद्धी कॉम्पल्यास्क, धोत्रे, धोत्रे वाडी, लोभेवाडी, धारेवाडी, चांधई, या ठिकाणी टँकरने पिण्याचे पाणी पाठवले जात आहे. सावंत यांच्या या कार्याचे सर्वत्र ठिकाणी कौतुक केलं जातं आहे..

Post a Comment

0 Comments