Type Here to Get Search Results !

गीता घारे शाळेचा दोन्ही माध्यमांचा निकाल १०० टक्के.....


 कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल २७ तारखेला लागला, कर्जत तालुक्यातील अनेक शाळांना  १०० टक्के निकाल लागण्यात यश आले आहे. त्यात सलग मागील काही वर्ष गीता घारे शाळेचा १००% निकाल लागत असून ह्या वर्षी देखील परंपरा तशीच अबाधित राहिली.

   ९५ टक्के गुण मिळवून साईराम याने शाळेतून प्रथम येत बाजी मारली आहे. गीता घारे शाळेचा दरवर्षी १००% निकालाचा पायंडा ह्या वर्षी देखील अबाधित राहिला.इंग्रजी माध्यम मधून साईराम किशन खात्रावट या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाने पास होत ९५% गुण प्राप्त केले. त्यानंतर नेत्रा चंद्रकांत शेळके हिने ९०:२० टक्के मिळवत द्वितीय क्रमांक तर भक्ती शशिकांत चोरधे हिने ८८;८० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

    सेमी इंग्रजी माध्यमातून हर्षदा सतीश जाधव ह्या मुलीने बाजी मारली ९१;२० % मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर सानिया प्रमोद देशमुख हिने ९०;८०% मिलवर द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्हीं माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आतोनात मेहनत घेत आपल्या पलकांच्या कष्टाची चीज केली आहे.

  या सर्वांचं शाळेचे अध्यक्ष श्री सुधाकर घारे, सचिव संजय खडे, मुख्याध्यापिका निमिता घारे, पर्यवेक्षिका शर्वरी जोशी यांनी व पालकांनी यांना गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments