कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) : राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून पनवेल मध्ये जोरदार प्रचारास सुरवात करण्यात आली.
पनवेल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार वाहून पनवेल मध्ये प्रचारास सुरुवात केली. पनवेल मध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदार सोबत हितगुज साधले, माधवीताई च्या कार्याचा झंजावत पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई जोशी भरघोस मतांनी विजयी होतील.
पनवेल येथील रॅली दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागृकतेने लोकशाही चे योग्य ज्ञान असावे. त्याबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न करणार. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई जोशी यांच्या पनवेलच्या दौऱ्यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेचा ध्यास मावळचा विकास हाच नारा देत प्रचार दौरा पूर्ण केला. यावेळी नेते मंडळी सुजाण नागरिक मतदार यांचा खूप मोठ्या संख्येने सहभाग लाभला.


Post a Comment
0 Comments