कर्जत प्रतिनिधी ( प्रफुल जाधव); महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना सकल मराठा समाज यांनी पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी ३ मे रोजी खोपोली येथे बैठक झाली. सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठ फिरवल्याने बारणे यांना मतदान न करण्याचा सर्वांनी बोलून दाखवले. त्यामुळे बारणे यांच्या विरोधातील तगडा उमेदवार संजय वाघेरेना एकदा संधी देण्याचे एकमेव ठराव करण्यात आला आहे.
महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोका दिला आहे. मराठा समाजाच्या मनात खूप रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यात मोठा विजय असल्याचा निर्धार सकल मराठा समाज करत आहे. मावळ मतदार संघात महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा खोपोली येथील बैठकीत देण्यात आला आहे.
मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून समाजासाठी भूमिका घेण्यासाठी मी बांधील आहे मराठा आरक्षणाबाबत संसदेत निर्भिड पणे भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करेल व मराठा समाजासोबत सर्वत्र समाज घटकांना न्याय देण्याचे काम करेल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी खोपोली येथील बैठकीत सकल मराठा समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments