कर्जत... मोतीराम पादीर : कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रे गाव शेजारील शीलारवाडी येथील जंगलातील डोंगर भागात अज्ञात व्यक्तीचे बेवारस मृतदेह आढळला आहे. अशी खबर लोकांनी धोत्रे गावचे पोलीस पाटील मनोज रसाळ व शिलार गावचे पोलीस पाटील जनार्दन रनावरे यांना दिली. तत्काल त्यांनी कशेले पोलीस स्टेशन यांना कळवले. त्यांनी ही माहिती कर्जत पोलीस स्टेशनला कलवताच psi जयवंत वारे घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी मानवी सांगाडा सडलेल्या अवस्थेत असल्याचं दिसून आले. मयत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 असेल आणि ती व्यक्ती 15 ते 20 दिवसांपूर्वी मृत झाली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
मृता जवळ भगव्या रंगाचा टी-शर्ट दिसला आहे, आणि त्यावर पुढच्या बाजूस सर्वसामान्यांचे सरकार असे लिहिलेले आहे, तर मागच्या बाजूस मी शिवसैनिक माझा मुख्यमंत्री आणि त्यावर बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद, दिघे,यांचा फोटो छापलेला आहे.
प्रेताचे काही अवयव त्या ठिकाणी आढळले, अर्धा हात, अर्धा पाय, मुंडकं, छातीचा काही भाग असे शरीराचे अवयव उचलून कशेले ग्रामीण रुग्णालय येथे पी एम साठी आणण्यात आले. पी एम केल्यानंतर त्या अवयवाला निर्जन ठिकाणी दफन करण्यात आले आहे. या व्यक्तीवर घातपात केलाय की काय किंवा अन्य कारण आहे, याचा शोध कर्जत पोलीस स्टेशनचे पीएसआय जयवंत वारे, राजेंद्र थोराणे, राहुल जाधव ,चालक हवालदार खैरनार घेत आहेत, तशी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पीएसआय.जयवंत वारे.करीत आहेत.
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे जर एखादी व्यक्ती मिसिंग झाली असेल तर कशेले व कर्ज पोलीस अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.
पीएसआय जयवंत वारे मो नंबर ९२०९६४७५७२
राजेंद्र थोरणे मो नंबर.९८८१६५२९२४
राहुल जाधव मो नंबर.९००४७९००२२ काहीही माहिती मिळताच या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Post a Comment
0 Comments