कर्जत. प्रतिनिधी (सुभाष ठानगे ); कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वावे, गावातील अंगणवाडी शाळेचे अवकाळी पावसामुळे व वाधली वाऱ्या मुले शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच शाळेत खोल्यांमध्ये बनवलेल्या सीलिंग देखील मोडकळीस आलेल्या आहेत त्यामूळ शाळेचं खूप नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे शाळेतील खोल्यांमध्ये पाण्याची गळती निर्माण झाली आहे. त्याच बरोबर ग्रामस्थांच्या घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या गावातील अंगणवाडी केंद्राचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. अंगणवाडी केंद्रावर बसवलेली नवीन लोखंडी पत्रे, वादळात उडून गेली आहेत, तर त्या खाली बसवण्यात आलेले फायबर सीलिंग कोसळून देखील मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकराबाबत गणेश धारणे यांनी कर्जत पंचायत समिती मध्ये कळविले आहे, कर्जत पंचायत समितीचे एकात्मिक बालविकास विभागाने त्याची दखल घ्यावी व अंगणवाडी केंद्रावरील पत्रे उडाल्याने केंद्रावर पोषण आहार घेण्यासाठी येणाऱ्या बालकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. याची कर्जत पंचायत समितीच्या अधिकारी यांनी दाखल घ्यावी...

Post a Comment
0 Comments