कर्जत (मोतीराम पादीर) ; कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या खांडस भागातील चाफेवाडी वडाची वाडी आदिवासी वाडी येथील टॅक्सी चालक अर्जुन खंडवी यांची मुलगी स्नेहाली अर्जुन खंडवी इयत्ता १२ वी .कला शाखेतून ७०;१७ टक्के गुण मिळवून मा. भाऊसाहेब राऊत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर कशेले शाले मधून इयत्ता १२ वित शिक्षण घेत असताना कला शाखेतून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. स्नेहाली खंडवी हिची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तिने इयत्ता पहिली पासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण शासकीय आश्रमशाळा चाफेवाडी शाळेतून पूर्ण केले १० वित ८३;८० टक्के मार्क मिळून चांगल्या प्रकारे टक्केवारी पाडून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला होता.
स्नेहाली खंडवी खूप हुशार मेहनती आणि जिद्दी असल्याने पुढील शिक्षण घेण्यासाठी कशेले येथील माननीय भाऊसाहेब राऊत माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथे ११वी इयत्तेत कला शाखेतून तिने प्रवेश मिळवला. तिचे वडील कशेले येथील नाक्यावर कशेले ते खंडस नांदगाव ला लाईनवर टॅक्सी चालक म्हणून टॅक्सी चालवत असतात. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने घरात कमावते एकटे तिचे वडील आहेत.दिवसभर टॅक्सी चालवून मिळालेल्या पैशातून मुलांचा शिक्षणाचा खर्च करून राहिलेल्या पैशातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जात असे. आई गृहणी असून एक मुलगा दोन मुली असे छोटे कुटुंब असून आपल्या मोठ्या मुलीला बारावीपर्यंत शिक्षण देत आज मुलीने शाळेत प्रथम क्रमांक मिळून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केले आहे. स्नेहाली व तिच्या आई-वडिलांचं सर्वत्र ठिकाणी कौतुक केलं जात आहे.

Post a Comment
0 Comments