कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) : सध्या देशासह राज्यभरातील शेतकरी वरून राजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल दिलासा देणारी बातमी दिली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून,मान्सूनच्या प्रवासाने वेग घेतला आहे . ज्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठीचे अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मान्सून ने आपला प्रवासाचा वेग वाढवला आहे दरम्यान आधीच 19 मे रोजी मानसून अंदमान निकोबार बेटांसह भारताच्या वेशीवर आला आहे. हवामान विभागाने मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने दरवर्षी मानसून एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यावर्षी मान्सूनच्या वेगाने प्रवासासाठी काहीशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काही दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यावेले आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. असा अंदाजहीत हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर दहा ते अकरा जून पर्यंत मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने वर्तविले आहे.

Post a Comment
0 Comments