Type Here to Get Search Results !

भालीवडी आश्रम शाळेचा बारावीचा निकाल १०० टक्के


 कर्जत ( मोतीराम पादिर) ; कर्जत तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेचा बारावी परीक्षा फेब्रुवारी - मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत कला शाखेतून एकूण ५४ तर विज्ञान शाखेतून २० विद्यार्थीनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा भालिवडी शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.. 

       या शाळेचे प्राचार्य मोहन पडघन यांचा अचूक नियोजनबद्ध अध्यापन तसेच विद्यार्थ्यांचे नियमित शिस्तबद्ध व अचूक अध्ययन यामुळे शंभर टक्के घवघवीत यश कन्या आश्रम शाळेला संपादन करता आले. त्या यशामागे प्राचार्य मोहन पडघन सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यां यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. या सर्वांचे वर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे...

Post a Comment

0 Comments