कर्जत प्रतिनिधी ( प्रफुल जाधव) ; कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे व वादली वाऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातील आदिवासी वाड्या पाडे वस्तीत व गावांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे तर कोणाच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत अनेक कुटुंब रस्त्यावरती आले आहे.
आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांच्या घरावरील ( छत्र)पत्रे ऊडून मोठे नुकसान झाले आहेत अशा सर्व नागरिकांना फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रे वाटप करण्यात आले आहे.
अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये नुकसान झाले आहे. हातावर मजुरी करणाऱ्यांना, नागरिकांना, पैसे नसल्याने घरावर उडालेले छत्र (पत्रे) आणायचे कसे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अपार कष्ट करून घर उभे केले मात्र या अवकाली पावसाच्या व वाऱ्यामुळे छत्र ऊडून गेले. परंतु ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कर्जतचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आपली सूत्रे हलवत पाहणी करून त्या नुकसानग्रस्त नागरिकांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रे देऊन त्यांना आर्थिक मदत केली आहे.
आमदार साहेबांच्या त्या मदतीच्या कार्याला आदिवासी बांधवांनी, ग्रामस्थांनी, त्यांचे आभार मानले आहेत. तसेच आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे. "जितेश समस्या तिथे आमदार महेंद्र शेठ थोरवे" अशा भावनिक उद्गार नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी काढले.


Post a Comment
0 Comments