कर्जत प्रतिनिधी .(सचिन लोंगळे) ; कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उमरोली गावातील ज्येष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचे ह भ प नारायण बुवा घारे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दिनांक १८/०५/२०२४ रोजी निधन झालं.
अत्यंत प्रेमळ, स्वच्छ मन, स्वभावाने खूप चांगले नारायण बुवा घारे यांच्या पश्चात एक मुलगी आणि चार मुले असा परिवार आहे. वारकरी संप्रदायात हरिपाठ, भजन, कीर्तन ,हे नामस्मरण अखेरच्या श्वासापर्यंत चालू होतं उमरोली गावातील हनुमान मंदिरा मध्ये शनिवार एकादशी निमित्त भजनात नेहमीच उपस्थित असायचे तसेच हनुमान जन्मोत्सव ,तुकाराम बीज ,उत्सव गोपालकाला, गणेशोत्सव ,या कार्यक्रमात नेहमीच कार्यरत असायचे, तसेच परिसरातही त्यांची उपस्थिती असायची.
नारायण बुवा घारे यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्याबद्दल समस्त उमरोली परिसरात दुःखाचे सावट पसरल आहे. त्याच वारकरी संप्रदायाच्या व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे.
उमरोली गावचे भजनी कलावंत श्री सचिनबुवा लोंगले व पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया संघटनेचे ता. उपाध्यक्ष यांनी नारायणबुवा घारे यांच्या बद्दल आदर व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली....

Post a Comment
0 Comments