Type Here to Get Search Results !

अबकी बार बारणेच खासदार,!


 कर्जत प्रतिनिधी.(प्रफुल जाधव); मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप ,राष्ट्रवादी ,मनसे ,आरपीआय, रासप मित्र पक्ष महा युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाचे नेते एकवटले असून ठीक ठिकाणी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे. लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत तालुक्यातील नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आज ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य अशा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

            या जाहीर सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून शिवसेनेची तोफ असलेल्या ज्योतीताई वाघमारे, व शिवसेनेचे नेहमीच चर्चेत असणारे लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले हे उपस्थित राहणार आहेत तसेच कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे, रायगड जिल्हाध्यक्ष संतोष शेठ भोईर, जिल्हा उपाध्यक्ष भाई गायकर, तालुकाध्यक्ष संभाजी जगताप, असे एक ना एक मान्यवर व शिवसैनिक या जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.

        काही दिवसांपूर्वीच खोपोली येथे झालेल्या एका सभेत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतदारांकडे मत मागत आहोत. सकारात्मक कार्य करणाऱ्यांच्या मागे हा मतदार राहतो असा अनुभव माझा आहे. आपण नेहमीच माणसे जोडण्याचे काम केले आहे. कधीही कोणाला त्रास दिलेला नाही. विरोधकांच्या या मतदारसंघात ताकद कमी आहे त्या मुले ते विनाकारण टीका करत आहेत. पण सूज्ञ मतदारांना वास्तुस्थिती माहित आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे शिवसेने कडून २ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.१० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांना उत्कृष्ट संसद रत्न म्हणून गौरविण्यात देखील आले आहे. यावेळी देखील निवडून येणार व हॅट्रिक मारणार असा विश्वास श्रीरंग बारणे यांना आहे.

Post a Comment

0 Comments