कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव); नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वत्र उमेदवार आपापल्या मतदार संघातून निवडणुकीच्या तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघातून त्रिकुट निवडणुकीची लडत रंगणार आहे.
या मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौ. माधवीताई नरेश जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिल्या स्त्रीव्यक्तिमत्व असलेल्या लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. या मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत. ताईंच्या विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल.
निवणुक परिपत्रानुसर मावल लोकसभेच्या निवडणुकांचे रणधुमाळी सुरू झाली आहे. मावल लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांची आज कर्जत येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढउन शुभाशिर्वाद घेऊन प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. या वेळी मावल लोकसभा मतदार संघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या, महिला आघाडी, भारतीय बुद्ध महासभा, युवा आघाडी, माथाडी कामगार आघाडी, अपंग विकास प्रसार केंद्र, मावळ लोकसभेतील सविधन मानणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी व सर्व गट कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments