कर्जत प्रतिनिधी ; पुढील महिन्यात हवामानात होणाऱ्या बदलांच्या अनुसरणाने पीक संरक्षणाबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. राज्याचे प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी त्यांच्या नवीन हवामान अंदाजात याबाबत विशेष सूचना केल्या आहेत. त्यांच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात तापाने थकलेल्या राज्यावर आता पावसाचे सावट येणार आहे या बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.
पंजाबराव डख यांच्या मते ७ मे ते ११ मे या कालावधीत राज्यात विधर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र , मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये अवकाली पावसाची शक्यता विजेच्या. कडकडासह , गारपिटीचा धोकाही टाळता येणार नाही, अशा परिस्थितीत पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. की त्यांनी ७ मे पर्यंत आपापल्या शेतातील पिकांची काढणी करून घ्यावी. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते यासाठी काढणी करून पिके सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.
अशा परिस्थितीत तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी बांधवांनी आपल्या परिसराती कृषी विद्यापीठांशी, कृषी विभागांशी, संपर्क साधावा. त्यांच्या सल्ल्यानुसार पीक संरक्षणाची उपाययोजना करावी. याशिवाय शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान कृषी सेवा केंद्राचा सहारा घ्यावा. एकंदरीत शेतकरी बांधवाना बदलत्या हवामानाची दखल घेऊन पीक संरक्षणाची योग्य ती काळजी घ्यावी मागील काही वर्षात अवकाली पावसात अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्यामुळे यावेळी सावध राहणे गरजेचे आहे.

Post a Comment
0 Comments