कर्जत प्रतिनिधी ( प्रफुल जाधव ) : कर्जत तालुक्यात गेले दोन-तीन दिवस उष्णतेचा पारा ४१ ' अधिक असल्याने नागरिक हैंरान झाले होते. त्यात सोमवार मंगलवार बुधवार देखील पावसाने हुकूमत गाजवत गुरुवारी देखील वातावरण ढगाळ असल्याचे दिसून आले होते.
पुन्हा अचानक वाधळी वाऱ्यासह कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी आवकाळी पावसाने जोरदार तडाखा देत पर्जन्य वृष्टी केली..
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील खांदन येथील सहा घरांचे पत्रे व काहि घरांच्या भिंती अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे कोसळल्या आहेत. चक्रीवादळ वाऱ्याने घरावरीपत्रे कोसो दूर उडाले. या मध्ये संतोष भगत, अनंता कडाली, महेंद्र कडाली, लहू कडाली, बुधाजी उघड, राम उघडा, या घर मालकांच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अवकाळी पाऊस वारा पावसाबरोबर गारांचा ही तडाखा तालुक्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना बसला आहे. नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून तत्काळ मदत कशी मिळेल अशा सूचना प्रशासनांना देण्यात आल्या आहेत.


Post a Comment
0 Comments