कर्जत.. (मोतीराम पादिर) . कर्जत तालुक्या झाडांची कत्तल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लाकडाची वाहतूक करणारा ट्रक या मध्ये १ ठार तर ३ जखमी झाले आहेत.
हा अपघात वारे कुरुंग या जंगल परिसरातील रस्त्यावर घडला आहे. मोठ्या मोठ्या झाडाची लाकडे भरून हा ट्रक भिवंडी च्या दिशेने निघालेला ट्रक रस्त्याच्या वळणाच्या उतारावर आला असता ट्रक मधील लाकडे ड्रायव्हर केबिन ला आधलून विचित्र आपघात घडला आहे.
या आपघातात ४२ वर्षीय नसीम हाजी अन्सार ही व्यक्ती मृत झाली आहे. दरम्यान रात्रीच्या अंधारात अवैधरित्या झाडांची तस्करी करून वाहतूक केली जाते हे पुन्हा एकदा समोर आले आहे. भिवंडी येथून ३/४ ट्रक कर्जत तालुक्यातील वारे कुरुंग या परिसरात आले होते. रात्रीच्या साडे दहा च्या सुमारास हेच ट्रक तोडलेल्या झाडांच्या लाकडाची भरणी करून पुन्हा आपल्या भिवंडी पडघा या दिशेने निघाले.mh १४Dm ७०३६ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये क्षमतेच्या पेक्षा जास्त प्रमाणात मोठी लाकडे भरलेली होती.
दरम्यान हा ट्रक कुरुंग ताडवाडी या रस्त्याच्या वळणावर असताना ट्रक मधील लाकडे ड्रायव्हर केबिनवर आधळली यामध्ये ट्रक चालकाचे वहानावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात उलटला. त्यावेळी ट्रकमध्ये चालकासह किनर तर अन्य दोन जण असे चार जण सोबत होते. या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर कडील केबिनचा भाग अक्षरशा तुटून किनर चा मृत्यू झाला. व चालकासह दोन जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णवायणीतून कलंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी जखमींना नेले, अधिक उपचारासाठी पनवेल mgm रुग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment
0 Comments