कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; सामाजिक कार्यकर्ते जयेश बाळाराम बोराडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोराडे समाज्या मध्ये अनेक वेगळे वेगळे समाज योगी उपक्रम राबवत असतात, कोरोना मध्ये प्रहॉस्पिटल मधल्या रुग्णांना जेवण, माजी सैनिककांचा सत्कार, यासारखे उपक्रम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केले आहेत.
याही वर्षी देखील २५ मे रोजी जयेश बोराडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन कोषाने गावातील भवानी माता मंदिरात मोफत आरोग्य तपासणी व पिण्याच्या पाण्याचे टँकर ने वाटप करण्यात आले.
जयेश बाळाराम बोराडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, व आयुर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कल्याण यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व प्रथम १५ नागरिकांना बोराडे यांच्या हस्ते मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुर्वात गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते भवानी मातेचे पूजन करून करण्यात आली. बोराडे यांच्या वतीने मान्यवरांचे शाल ,श्रीफळ, पष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढे कार्यक्रम सुरू करण्यात आला, ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला, यावेळी हॉस्पिटल च्या माध्यमातून इसिजी, बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, वजन, डोळे चेकउप, अल्प दरात चष्मे व मोफत चष्मा, गुडघे दुखी, औषध वाटप व सामान्य चाचण्या करण्यात आल्या. प्रथम १५ नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
या मोफत शिबिरात ७० ते ७२ ग्रामस्थांनी सहभाग घेतला या मध्ये महिला,ज्येष्ठ नागरिक तरुण पिढी, आणि आदिवासी समाजातील महिला यांचा चांगला प्रतिसाद होता. यावेळी या शिबिरात डॉ. प्रियांका पावशे, डॉक्टर विशाल बनसोडे, डॉ. योगेश गायकवाड, पोलीस पाटील निलेश ठोंबरे, अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सालोखे, नर्स देवयानी सतपाल, सावली सावजी, सचिन मिश्रा, सागर शेजवान, संपादक कर्जत प्रभात जयेश जाधव, कर्जत लाईव्ह यूट्यूब चैनल संपादक किशोरजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तेजस भासे, गायक अजय गायकवाड, चंद्रकांत पाटील,अंकुश ठोंबरे, बाळाराम पालकर संभाजी ठाकूर, मंगेश ठोंबरे ,महेंद्र ढाकावल, संदीप दाभने, अभिजीत दाभणे, संतोष ठोंबरे तानाजी ठोंबरे माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत उमरोली. हिरो ठोंबरे पांडुरंग बोराडे. या वेळी उपस्थित होते..

Post a Comment
0 Comments