Type Here to Get Search Results !

१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित.....

 

कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण)...१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने कर्जत  येथील एस टी महामंडळ कर्जत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर  संपन्न झाला.

       कामगार दिनाच्या निमित्ताने कर्जत एस टी बस डेपो. महामंडळाच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, यावेळी माधवबाग चे डॉ. बन्सीलाल पाटील, यांचं मार्गदर्शन लाभले, या वेळी इ.सि.जी. बी पी, सुगर, रक्तातील चाचण्या, रक्त गट तपासणी, कॉलेस्ट्रॉल, वजन, डोळे तपासणी. मोफत चष्मा वाटप, व सामान्य चाचण्या,ई तपासण्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आल्या, यावेळी एस टी महामंडळाचे मोरे साहेब यांचं सहकार्य लाभले, या शिबिरास ७५/८० कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. 

        

         यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, माधव बाग डॉ बन्सीलाल पाटील, डॉ पाटील मॅडम, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, डॉ विशाल बनसोडे,२ नर्सेस, सिस्टर, एस टी महामंडळाचे मोरे साहेब ई उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments