कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) . आवकाली पावसाचा तडाखा कर्जत तालुक्यातील मोरे वाडी येथील आदिवासी कुटुंबास बसला आहे. वादळाने त्याचे संपूर्ण घर मोडकळीस आले आहे. देव बलवत्तर म्हणून घरातील सदस्य बचावले.
मोरेवाडी येथील घटना,दरम्यान केवारी यांच्या दोन लहान मुलांवर कशेले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोरेवाडी येथील किसन केवारी यांचे घर वाऱ्यात मोडून पडले ,यावेळी घरात त्यांची पत्नी हिरा किसन केवारी, सून गीता केवारी, नातू तन्मय केवारी व अश्विन केवारी असे चार सदस्य होते, घराचा काही भाग अंगावर पडल्याने दोन मुले आणि मुलांची आई हे जखमी झाले आहेत तर हिरा किसन केवारी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Post a Comment
0 Comments