कर्जत.प्रतिनिधी... कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली हद्दीतील बार्डी गावामध्ये कै. अंकुश वसंत लोंगळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजन केले जाते, अती दुर्गम भागात, वाड्या, वस्त्या, बहुल समाज, ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवली जात नाही अश्या विविध ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवले जातात.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
गावातील हनुमान मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ विशाल बनसोडे यांच्या हस्ते मंदिरात पूजा व श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळी गावातील महिला, तरुण, व ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला, यावेली 60/70 नागरिकांनी आपल्या चाचण्या करून घेतल्या,या मध्ये जी प्लस मल्टी स्पेशलिस्ट हार्ट हॉस्पिटल. यांच्या वतीने मोफत इसिजी,बिपी, सुगर, कॉलेस्ट्रॉल, वजन, रक्तातील चाचण्या, सामान्य चाचण्या ताप, गुडघे दुखी, त्याच प्रमाणे मोफत औषधे वाटप करण्यात आली.
असा उपक्रम राबवणे आणि ते ही आपल्या छोट्या भावाच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ, अगला वेगळा उपक्रम आपल्या भावाच्या प्रेमा पोटी, त्यांचे मोठे भाऊ जयवंत लोंगळे, याच आणि गावातील मंडळी यांचं योगदान महत्त्वाचे आहे, भावाच्या आठवणी ताज्या राहाव्यात म्हणून या शिबिराच आयोजन करण्यात आले.
या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सालोखे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री. रतन लोंगळे, भाजप तालुका उपाध्यक्ष श्री दर्शन कांबरी, ग्रामपंचायत सदस्य विश्वास लोभी. कृषी पुरस्कार प्राप्त हेमंत कांबरी, जयवंत लोंगळे, डॉ. विशाल बनसोडे, डॉ सागर,आणि सहकारी .. ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments