कर्जत. प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमा नगर येथे राहणारी दीव्या मोहन खुजुर हीचे लग्न होऊन पती अजय कृष्णा भिंडलाल इंदर्गड चींडीचांडी पानिपत हरियाणा येथे नांदत होती. त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले म्हणून दिव्या सासारहून कंटाळून नेरळ येथे राहण्यास आली. तिचा पती अजय ने नेरळ येथील दिव्या चे घर गाठले.
पती अजय याने पत्नी बरोबर काही बोलायचे म्हणून, घरी दिव्याची आई झोपली आहे हे पाहून तिला काही महत्त्वाचे बोलायचं आहे म्हणून तू माझ्या सोबत बाहेर चल असे सांगून तिला उमा नगर येथिल स्मशान भूमी जवळील जंगलमय भागात घेऊन गेला. पतीने दिव्याला माझ्या सोबत माझ्या गावी नांदायला चल असे सांगितले, त्यास दिव्याने नकार दिला म्हणून अजय याने त्याच्या जवळील बँग मधून मोठी सुरी काडून दिव्याच्या गळ्यावर, डाव्या हातावर, खांद्यावर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.पण दिव्या हिने कसाबसा तेथून पळ काढला. रक्त बांबल होऊन तिने पाहिले आपले घर गाठले. तिच्या आईने विलंब न करता तिला नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. व ही माहिती नेरळ पोलिस यांना दिली.
नेरळ पोलिस यांना खबर मिळताच. नेरळ पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलिस उपनरीक्षक प्राची पांगी, पोलिस उ.प. निरीक्षक सरगम, श्रीरंग किसवे, यांनी.घटनास्थळाला भेट दिली. जखमी दिव्या हिच्या सांगण्यावरून घटना ठिकाणी पाहणी केली असता आरोपीने तेथून पलायन केले होते, मात्र दिव्यावर वार केलेली सुरी मिळाली म्हणून त्याचा पंचनामा करण्यात आला.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अजय याला अवघ्या पाच तासात मुंबई जोगेश्वरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे जखमींच्या कुटुंबातील लोकांनी समाधान व्यक्त केले. गुन्हा क्रमांक १०७/२०२४ भा. द. वी. कलम ३०७ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.स. ई. नितीन मंडलिक करीत आहेत. जखमी वर पुढील उपचार उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात होत असून तिची प्रकृती स्थिर आहे.
या आधी देखील नेरळ खोपोली परिसरात अशा घटना घडलेल्या होत्या अश्या प्रसंगाच्या वेळी अजू बाजूच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन नेरळ पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी जनतेला केले आहे..

Post a Comment
0 Comments