कर्जत. खालापूर..अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य अंतर्गत कर्जत तालुका व खालापूर तालुक्यातील असंख्य लोकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
देशात, राज्यात, सध्या निवडणुकीचे रणशिंगफुंकले असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात सगळीकडे आप आपल्या पक्षाच्या वतीने प्रचार कार्य सुरू आहे त्यातच समाज्यात तला गालात समाजकार्य करणारी तालुक्यातील एकमेव संघटना म्हणून अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, यांच्या वतीने आज डिकसल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भव्य नियुक्ती पत्रक वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या महिन्याच्या १६ एप्रील रोजी पाथरज वॉर्ड, शिलार वाडी येथे १८० कार्यकर्त्यांना संघटनेचे नियुक्ती पत्रक देण्यात आले.
२८ एप्रील रविवार कर्जत तालुक्यातील डिकसल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित भव्य नियुक्ती पत्रक वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी तालुक्यातील अनेकांना तालुका स्तरावरील पदे देण्यात आली यावेळी भव्य नियुक्ती सोहळ्यात .१४५. कार्यकर्त्यांनी.सहभाग घेतला. यावेळी, मावळ लोकसभा मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या भावी खासदार सौ. माधवी ताई नरेश जोशी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे,, जिल्हा सेल अध्यक्ष गणपत हिंदोळा, सह संपर्क प्रमुख संतोष थोरवे, तालुका सचिव अक्षय बोराडे, सेल अधक्ष शांताराम मिरकुटे, शाम देशमुख,अशोक देशमुख,आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments