खालापूर प्रतिनिधी.... खालापूर तालुक्यातील चौक रस्त्या लगत असलेल्या मोरबे गावातील घटना. येणं गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी मोरबे गावातील तरुण वय ३८ वर्षीय याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.ही बातमी जशी गावामध्ये पसरली तसे गावातील तरुण वर्ग आक्रमक झाले आहेत.
वारंवार महावितरन कार्यालयाशी पत्रव्यवहार करून देखील महावितरण च्या अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष.३८ वर्षीय तरुणाचा नाहक बळी गेला...गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी सगळीकडे गुडी उभारण्याच काम चांगल्या आनंदाने चालू असते, अशातच खालापूर तालुक्यातील मोरबे गावातील ३८ वर्षीय तरुण रवींद्र जगन्नाथ राणे हे सुद्धा दरवर्षी प्रमाणे आपल्या घारा लगत गुडी उभारण्याची तयारी करत होते.
गुडी उभारण्याची पूर्व तयारी झाली असता त्यांनी गुडी उभारण्यास सुरुवात केली परंतु घराच्या बाजूलाच महावितरण ची एसटी लाईन असल्यामुळे त्या एसटी लाईनला गुढी लागल्याने त्या तरुणास जब्बर शॉक लागून तो तरुण जमिनीवर कोसळला, त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या आईला व बायकोला ही शॉक लागला आहे त्यात त्याच्या आईला शॉक लागून जमिनीवर पडल्याने आईच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.
त्या वेळी जमिनीवर कोसळलेल्या रवींद्र ला ताबडतोप चौक येथील साई हॉस्पिटल येथे हलविण्यात आले, तो पर्यंत रवींद्र ची प्राण जोत मावळलेली होती. रवींद्र च्या मागे त्याची आई, बायको, भाऊ, व दोन मुले असा त्याचा परिवार आहे, परंतु घरातील कर्ता पुरुष गेल्या कारणाने त्यांच्यावर दुःखच डोंगर कोसळला आहे.
गावातील जिल्हा परिषद सदस्य श्री मोतीरामसेठ ठोंबरे यांच्या म्हणण्या प्रमाणे मोरबे एस टी लाईन गावाच्या बाहेरून नेण्यास संधर्भात महावितरण ला वारंवार पत्र व्यवहार केले आहेत, वारंवार अधिकारी यांच्याशी संपर्क साधून गावातील खराब पोल, विद्युत लाईन,आणि घरावरून गेलेल्या विजेच्या तारा या गावाच्या बाहेरून नेण्यात याव्या परंतु महावितरण च्या अर्मुठे पणामुळे आज गावातील तरुण रवींद्र याला विजेचा शॉक लागून आपला जीव गमवावा लागला.
गावातील तरुण वर्ग आक्रमक झाला आहे. जर महावितरण याने एस टी लाईन गावाच्या बाहेरून नेली नाही तर आम्ही मोठं आंदोलन सुरू करू महावितरण कार्यालयास घेराव घालू. असे गावकऱ्यांचा तरुण वर्गाचं म्हणणं आहे. अजून किती नाहक बळी घेण्याची वाट बघत आहे महावितरण असा सवाल देखील गावकऱ्यांनी केला आहे.



Post a Comment
0 Comments