कर्जत प्रतिनिधी (रतन लोंगळे ). महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्येष्ठ निरुपणकार परमपूज्य तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले आणि त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी धर्माधिकारी कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी उपस्थित होती. तसेच आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, डॉ सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, तसेच कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments