Type Here to Get Search Results !

कर्जत पंचायत समिती कडून, अखेर आषाने गावातील ग्रामस्थांची तहान भागली

 


कर्जत प्रतिनिधी ( प्रफुल जाधव) : उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने ग्रामस्थाकडून ग्रामपंचायत उमरोली मध्ये जाऊन पाण्याची व्यथा मांडली.. गावातील प्रमिला ठानगे यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत मध्ये असंख्य गावातील महिलांना घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात ची मागणी केली त्यावेळी ग्राम विकास अधिकारी रामलाल चौधरी व ग्रामपंचायत सरपंच ठमीबाई सांबरी यांनी आपल्या गावातील समस्या बाबत तत्काळ कर्जत पंचायत समितीला कळविले जाईल असे जाहीर आश्वासन दिले त्यानंतर पंचायत समिती मधील पथकाने तत्काल अशाने गावात भेट देऊन तेथील समस्या व कोरड्या पडलेल्या विहिरींची पाहणी केली या गावांमध्ये नलाचे पाणी नसल्यामुळे दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू होते पंचायत समितीच्या पथकाने तत्काळ पाहणी करून पंचायत समितीकडून अशाने गावासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठविण्यात आले आणि तेथील विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकण्यात आले आहेत.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ मनोज ठाणगे मथुरा श्रीखंडे ताई श्रीखंडे गीता श्रीखंडे गौरी श्रीखंडे विमल जांबुलकर अनिता ठाणगे आधी महिलांनी उमरोली ग्रामपंचायतकडे मागणी केली होती व कर्जत पंचायत समिती यांनी या गावातील ग्रामस्थांची टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याने तहान भागवली.. ग्रामस्थ महिलांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments