Type Here to Get Search Results !

उमरोली येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव आनंदात साजरा



 कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उमरोली गावात संत तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उस्थहाने साजरा करण्यात आला.

       या कार्यक्रमात श्री भाऊ बुवा लोंगळे यांच्या मार्गद्शना आणि श्री दिलीप बुवा ठानगे यांच्या नेतृत्वखाली पुढील कार्यक्रम करण्यात आला.
      पहाटे ५ वाजता काकडा, आरती सकाळी ९ वाजता दीप पूजन संत तुकाराम महाराज प्रतिमेचे पूजन श्री नारायण बुवा घारे आणि भाऊ बुवा लोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर सकाळी १०:३० ते १२:३० कीर्तन श्री नरेश महाराज पाटील यांचं हरिकिर्तन.

       गावामध्ये सगळीकडे खूप आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर २ ते ३ चक्री भजन,४वाजता पालखी मिरवणूक, पूर्ण गावातील महिला वारकरी, गायक, वादक, लाहांनमुळे परिसरातील मान्यवर गायक, या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. संध्याकाळी ८ ते ९:२० महाप्रसाद ९:३० वाजता श्री अविनाश मोरे सर श्री शिव शंभू विचारदर्षन शिव स्मारक समिती रायगड यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
         संत श्रेष्ठ तुकाराम महाराज , राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर व्याख्यान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आकर्षण श्री सचिन बुवा लोंगळे, तुकाराम महाराज बीज चे गान तुकारामहाराज यांच्या पालखीला आकर्षण ठरले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविक, भक्तांचे सर्व देणगीदार यांचे व पंचक्रोशीतल वारकरी यांचे, साथकऱ्यांचे, वाद कांचे, ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री सचिन बुवा लोंगळे यांनी आभार मानले...

Post a Comment

0 Comments