कर्जत प्रतिनिधी ( सूरज चव्हाण) : उष्म घाताची करणे. ; घराबाहेर जास्त वेळ काम करते वेळी किंवा उन्हाळ्यात इतर मजुरी ची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूम मध्ये काम करणे, काचेच्या कारखान्यात काम करणे. उच्च तापमान खोलीत काम. उष्माघात हा थेट उष्णतेच्या सतत संपर्कामुळे किंवा वाढलेल्या तापमानाच्या परिस्थिती मुले होतो.
लक्षणे ; थकवा, कोरडी त्वचा, भूक न लागणे, ताप, चक्कर येणे, डोके दुखी, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थता व अस्वस्थ, बेशुद्ध इत्यादी..
उपचार ; पंखे कुलर खोली ठेवावे, वातानुकूलित खोली ठेवावी, रुग्णांचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, रुग्णांना हवेशीर खोलीत ठेवावे, रुग्णांना थंड पाण्याने अंघोळ घाला, रुग्णांच्या कपालावर थंड पाणी ठेवावे, आवश्यकतेनुसार सलाईन द्या. तसेच हे करा.: पुरेसे पाणी घ्या ,प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे ठेवा, पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा, ओलसर पडदे, पंखा ,कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा,
हे करू नका ; शक्यतो उन्हाच्या वेळेत घरा बाहेर जाणे टाळा, कष्टाची कामे उन्हात करू नका, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका, मद्य,चहा, कॉफी, शक्यतो टाळा, खूप प्रथिने युक्त अन्न आणि शिले अन्न खाऊ नका....

Post a Comment
0 Comments