कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; कर्जत तालुक्यात, येणारे सण उत्सवाच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहील या उद्देशाने शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात याकरिता कर्जत पोलीस दलातर्फे शहरात रूट मार्च काढण्यात आला आहे.
कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी तथा एस आर पी एफ यांच्या द्वारे व उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत टेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज शहरात रूट मार्च काढण्यात आला. नुकताच येणारे सण श्री. रामनवमी, श्री हनुमान जयंती, श्री महावीर जयंती, या सण उत्सव च्या अनुशंगाणे मा उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे साहेब यांच्या मार्गद्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशन ग्राउंड ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक नंतर कर्जत बाजार पेठ पुढे जाऊन महावीर पेठ जकात नाका कपालेश्वर मंदिर ते पुन्हा कर्जत पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च साठी कर्जत पोलीस ठाण्यातील २ अधिकारी, १६ अंमलदार, आरसीपी प्लाटूनचे ३० अमलदर, एस आर पी एफ प्लाटून चे १ अधिकारी, व १६ अमलदार रुट मार्च साठी हजर होते.

Post a Comment
0 Comments