Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया पाथरज वॉर्ड शिलार वाडी भव्य नियुक्ती सोहळा,


 कर्जत. प्रतिनिधी..... कर्जत तालुक्यातील पाथरज वॉर्ड विभागात कार्यरत असलेल्या अनेक लोकांनी अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेत सामील झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत कर्जत तालुक्यातील शिलार वाडी व अजू बाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांनी सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत असलेल्या पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली या संघटनेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवेश केला आहे.

                महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांच्या वर विश्वास ठेऊन, समाज्यात आपण काही देणं लागतो, एक मेकांस सहाय्य करू अश्या या आपल्या वक्तव्याने आपल्याला एकमेकांना मदत कशी होईल, अडी अडचणीच्या प्रसंगी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.


                  पाथरज वॉर्ड शिलार वाडी व परिसरातील असंख्य  नागरिकांना संघटनेचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांना उद्दिष्टे काय आहेत हे पटऊन देऊन त्यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले. या वेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन लोंगळे, प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुप्रेश साळोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, तालुका युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, पत्रकार व तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री मोतीराम पाधिर, रायगड जिल्हा सेल श्री गणपत हिंदोळा, महासचिव रुपेश कदम, वार्ड अध्यक्ष श्री प्रफुल साळोखे, भास्कर शेंडे, गोपीनाथ कांबडी, दशरथ पुजारी, ज्ञानेश्वर पारधी,वामन हिंदोळा, पांडू निरगुडा माजी सरपंच महादू शेंडे, लक्ष्मण संबरी, आदी मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments