कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण) ; कर्जत पोलिस ठाणे हद्दीत. के ई एम शाळेत आपल्या मुलांना सोडविण्यासाठी आलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्याने मोटार सायकल वरून मागून येऊन खेचून चोरी करून पसार झाले आहेत या बाबत कर्जत पोलिस स्टेशन मध्ये रजी नं २९९/२०२३ कलम ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत पोलिस स्टेशन चे उपविभागीय अधिकारी विजय लागरे व वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गरड यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सी सी टिव्ही फुटेज व तांत्रिक आणि गोपनीय माहिती च्या मदतीने गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्यांच्या कडून चोरी केलेला ९१.५०० रू. किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
तसेच कर्जत मध्ये राहणारे दिलीप भोईर यांचे बंद फ्लॅट चा दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम १.७५००० रू किमतीचा मुद्देमाल दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपी घरफोडी करून नेलेल्या मुद्देमालापैकी१.३५००० रू किमतीचा सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो बाईक जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या निर्णयानंतर मूळ मालक यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यामुळे कर्जत पोलिस स्टेशन चे कर्जतकर कौतुक करत आहेत.

Post a Comment
0 Comments