Type Here to Get Search Results !

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज...


 कर्जत प्रतिनिधी ( प्रफुल जाधव); शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार व इंडिया आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री संजोग वाघेरे पाटील यांनी आज आकुर्डी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भव्य तुफान रॅली व गर्दीत आज यांनी अर्ज सादर केला. विजयाचा गुलाल तर आमच्याच अंगावर पडणार असे चित्र दिसून येत होते. यावेळी इंडिया आघाडी मधील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

       आपली निशाणी" मशाल" या निवडणुकीत विरोधी उमेदवाराचे दहन केल्या शिवाय राहणार नाही असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. या वेळी संजोग वाघेरे पाटील यांच्या समवेत शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, सचिन अहिरे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शेकाप चे बालाराम पाटील, शिवसेनेचे बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, कर्जत खालापूर मतदार संघाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत, तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे, शिवसेना युवा सेना महिला आघाडी तसेच मावळ मतदार संघातील आप, काँग्रेस, व इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


           त्याच प्रमाणे असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदार संघातून संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड मताने विजयी करा आपली निशाणी" मशाल" असे आवाहन करण्यात आले..

Post a Comment

0 Comments