Type Here to Get Search Results !

सुधाकर घारे फाउंडेशन कडून भागवली पिण्याच्या पाण्याची तहान.


कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; कर्जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप प्रमाणात वाढत आहे. शासकीय टँकर ने पाणी मिळत नसल्याने पाणी टंचाई तीव्र झाली आहे.

      स्थानिकांच्या मागणी नुसार कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई भागात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुधाकर घारे यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षी देखील एप्रील महिन्यात कर्जत तालुक्यातील पाणी टंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाई भागातील गावे आणि वाड्यातील स्थानिक ग्रामस्थांच्या मागणी नुसार माजी सरपंच मधुकर घारे यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर घारे फाउंडेशन कडून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.

         सहा हजार लिटर क्षमता असलेले पाण्याचे टँकर या आठवड्यात कर्जत तालुक्यात सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील ओलमन,कळंब, पेठारवाडी, पादिरवाडी, बांगरवाडी, आवलस, उंबरवाडी, बोरगाव, भवानी पाडा, झुगरेवाडी, टेपाचीवाडी, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई असलेल्या पाच गावे व वाड्यांमध्ये शासनाच्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तरी देखील दुर्गम व आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचे टँकरच्या माध्यमातून पाणी देण्याचे कार्य सुरू आहे.

Post a Comment

0 Comments