Type Here to Get Search Results !

अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद. पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली आयोजित महा आरोग्य शिबीर.


 कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; १६ एप्रील मंगळवार रोजी पाथरज वार्ड विभागात अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमानाने शिलारवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

           संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ठिकाणी सामाजिक कार्य केले जाते, त्यातच पाथरज वार्ड मधील शिलारवाडी येथे आरोग्य शिबिर भरवण्यात आले त्यामध्ये एसीची बीपी शुगर कोलेस्ट्रॉल वजन गुडघेदुखी ताप डोळे तपासणी व अन्य सामान्य चाचण्या करण्यात आल्या.


         या वेळी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष लहान मुले यांनी सहभाग घेतला, अंगाजे ८० ते ८५ नागरिकांनी सहभाग घेऊन अपली नोंद केली. या वेळी माधव बाग डॉ बन्सीलाल पाटील, डॉ विशाल बनसोडे, डॉ स्वप्नाली पाटील, डॉ कल्याणी ठोंबरे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे, प्रदेश युवक अध्यक्ष सुप्रेश सालोखे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु प्रफुल जाधव, कर्जत तालुका युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, रायगड जिल्हा सेल गणपत हिंगोला, वामन हिंदोळा, ज्ञानेश्वर पारधी, भास्कर शेंडे, गोपीनाथ कांबडी, दशरथ पुजारी, पांडू निरगुडा, माजी सरपंच महादू शेंडे, लक्ष्मण सांबरी. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments