कर्जत प्रतिनिधी (मोतीराम पादिर) ; कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने तालुक्यातील डोंगर दुर्गम भागात असलेल्या परिसरात पाणीटंचाईची झल बसायला सुरुवात झाली आहे. तालुक्यात शासनाच्या जल जीवन मिशनचे काम काही भागात पूर्ण झाल्याने त्या वाड्यांचा विचार यंदा पाणी टंचाई कृती आराखड्यात केलेला नाही ,मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जल जीवन मिशनचे कार्य कोरडे पडल्याने ग्रामस्थांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
तालुक्यातील चाफेवाडी या महसुली गावाच्या हद्दीतील पाच वाड्यांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ६९ लाख रुपयांची योजना मंजूर झाली मात्र या वाड्यांना जल जीवन मिशनच्या योजनेचे पाणी मिळेल की नाही असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. यामध्ये पाणी योजना असताना देखील जर कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन आयुष्य काढावे लागणार असेल तर या योजना फक्त नावालाच का ?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी नेत्यांनी पाणी दिले मात्र आता पाणी दिले जात नाही. नेते आता मत मागायला येतील तेव्हा त्यांना आमच्या वाड्या वस्त्या दिसतील, मात्र "कोण तो खासदार"आम्ही दहा वर्ष पाहिला नाही. कोणीही निवडून या पण आम्हाला पाणी द्या अशी अर्थ हाक ग्रामस्थ करत आहेत. तालुक्यातील पाच वाड्यांसाठी जल जीवन मिशनची विहीर उन्हाळ्यात आटल्याने तेथील चाफेवाडी, मेंगाळवाडी ,वडाचीवाडी, टेपाचीवाडी, व शाळेची वाडी अशा वाड्यांचा समावेश होतो. त्यामुळे जल जीवन मिशन योजना फसली आहे. तर पुन्हा महिलांना डोक्यावर हंडे घेत नदीमध्ये खड्डे खणून त्यातून कळशीभर पाणी जमा करावे लागत असल्याचे भयान दृश्य दिसून येत आहे.


Post a Comment
0 Comments