Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निम्मित मोफत शिबिराचे आयोजन..

कर्जत प्रतिनिधी (सूरज चव्हाण) ; भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने अ. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंदू पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली विद्यमाने रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कु. प्रफुल जाधव यांच्या वतीने आज डिकसल येथील वैशाली सायबर कॅफे येथे शिबिराचा आयोजन करण्यात आले. यावेळी अनेकानी आपली नोंद करून आपल्या सोई निसार सरकारच्या नियमानुसार सरकारनी राज्यात जनतेच्या हितासाठी काही आरोग्य उपाय योजना राबविण्यात आल्या होत्या त्यातच प्रफुल जाधव यांनी त्यांच्या माध्यमातून अनेकांना या योजनेचा फायदा कसा होईल याकडे लक्ष देऊन आज त्यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमा मुले अनेे नागरिकांना दिलासा मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचेे राष्ट्रीय अध्यक्ष श्री  ज्ञानेश्वर सालोखे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार व पूजन करून सुरुवात करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सल्लागार श्री उत्तम ठोंबरे रायगड जिल्हा सदस्य सुभाष ठाणगे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल जाधव कर्जत तालुका येयुवक अध्यक्ष सूरज चव्हाण, तालुका महा सचिव श्री रुपेश कदम ,सह्याद्री प्रतिष्ठान तालुका अध्यक्ष  समाधान पाटील , श्रीराम पाटील, पंढरीनाथ ठाकरे, महेंद्र सालोखे आधी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments