कर्जत प्रतिनिधी (प्रफुल जाधव) ; हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराज छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदूंस्थानाचे प्रेरणा स्थान छत्रपती शिवाजी महाराज.जयंती निमित्त महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय २१ सामाजिक समाजकार्य कर्ते यांना राजा शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय मानवधिकार, राजदूत संघटना, जागतिक शांती सेना, भारतीय महाक्रांती सेना, ऑल इंडया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी, पोलिस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना, अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
मुंबई येथील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील डिकसल गावचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर साळोखे यांना या वर्षीचा राजा शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला.
डिकसल गावचे सुपुत्र आणि अ. पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. अशी त्यांची अगळीच ओळख. गेली अनेक वर्षापासून समाजात सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकरिकेच्या माध्यमातून अनेक दुर्गम भागात आरोग्य शिबिरे, नागरिकांना मदत, शालेय विद्यार्थी यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी, त्यांना शालेय साहित्य वाटप, कोरोना महामारित मदत, यांना सारखे अनेक उपक्रम राबविले.
अ.पोलिस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली या संघटनेच्या माध्यमातून व संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांच्या हातून हे कार्य झाले आहे. असे त्यांनी सांगितले. आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक दुर्गम भागात विविध ठिकाणी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या याच समाजकार्यातून त्यांनी आपल्या साघटनेच नाव संपूर्ण महाराष्ट्रात पसरविले आहे. त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची प्रसिद्धीचा गाजावाजा न करता अपल समाज कार्य पुढे चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निकट वर्गीय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने माननीय सभापती मनोहर शेठ थोरवे व पत्रकार जय जाधव यांच्या हस्ते ज्ञानेश्वर सालोखे यांचा सत्कार करण्यात आला.


Post a Comment
0 Comments