Type Here to Get Search Results !

माथेरान रोप वे चा मार्ग मोकळा, लवकरच पूर्ण होणार रोप वे चे काम.


 माथेरान.. (गोविंद सांबरी) ; नेरूळ पासून हाकेच्या अंतरावर असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे माथेरान. निसर्गाने भरभरून अलौकिक निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते संपत्ती दिलेल्या माथेरानला दृष्टीक्षेपात आणण्यासाठी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महत्त्वकांक्षी रोपवे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने पर्यटकांनाही पर्वणीचा ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायात भर पडण्याबरोबरच सर्वसामान्य मोल मजुरांना देखील आगामी काल सुगीचा ठरणार आहे.

          माथेरान बरोबरच राज्यातील इतर तीन रोपवेच्या कामांना लवकरच सुरुवात होत असून मिलालेल्या माहितीनुसार एकच कंपनी हे सर्व कामे करणार असून त्यानुसार हालचालींना वेग आला आहे. काही वेळात ह्या रोपवेची कामे केली जाणार असल्याने माथेरानचा हा प्रकल्प आता लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

            या प्रकल्पाची लांबी ३३०० मीटर इतकी असून उंची ८५० मीटर इतकी असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सदरचा रोपे वे हा आशिया खंडातील सर्वात मोठा रोपवे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. हा मार्ग कर्जत येथील डिकसल ( भिवपुरी स्टेशन) येथून माधवजी पॉईंट पर्यंत येणार आहे.

  गेल्या वीस वर्षापासून माथेरान कर प्रतीक्षेत होते तो प्रकल्प आता मार्गी लागणार असल्याने एक उत्तम पर्यायी मार्गाची व्यवस्था या निमित्ताने होणार आहे. सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची ह्या कंपनीकडून माहिती देण्यात आल्याचे समजते. हा प्रकल्प पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार असून पुढील तीन महिन्यात रायगड जिल्ह्यातील हा प्रथमच एवढा मोठा प्रकल्प उभा राहत असून माथेरानचे खरे वैभव पर्यटकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास करताना या माध्यमातून माथेरानच्या चतुरसीमे कडील पॉइंट्स ची नयनरम्य दृश्य प्रवाशांना न्याहलता येतील तसेच पर्यटकांची वेळेची बचत देखील होईल.

Post a Comment

0 Comments