Type Here to Get Search Results !

इ रिक्षा देत नसल्यामुळे माथेरानमध्ये हात रिक्षा सेवा बंद. पर्यटकांचे हाल


 माथेरान ; (गोविंद सांबरी) थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेले माथेरान पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. हात रिक्षा ओढण्याच्या अमाननीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी मागील बारा वर्षांपासून विविध स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत ई रिक्षा सुरू व्हावी जेणेकरून सन्मानाचे जीवन जगता येईल. या कामी अथक परिश्रम केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सनियंत्रण समितीला दिलेल्या निदर्शनानुसार या ठिकाणी दोन वेळा या ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. शिवाय या ई रिक्षा हात रिक्षा चालकाला देण्यात याव्यात असेही सुचित करण्यात आले. देखील सनियंत्रण समितीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून कोणत्या आधारावर आणि लाभासाठी ठेकेदाराला व्यवसाय करण्यासाठी दिलेल्या आहेत. याबाबत या समितीच्या कामकाजावर स्थानिकांना संशय व्यक्त होत आहे.

सध्याची स्थिती पाहून एकूण 94 हात रिक्षांनाच परवाने असून त्या कष्टकरी चालक आणि आरामात बसून भाडे घेणाऱ्या मालक वर्गाने शासन दरबारी पाठपुरावा केल्यावर इ रिक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु त्या ई रिक्षा हाच रिक्षा वाल्यांनाच न देता परस्पर ठेकेदाराला दिले आहेत. नुकताच सनियंत्रण समितीने याबाबत बैठकीचे आयोजन केले होते, त्यामध्ये हात रिक्षाच्या सदस्यांना चर्चेसाठी न घेता ठेकेदाराला बोलावून त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे ठेकेदार आणि ह्या समितीच्या सदस्यांमध्ये काही आर्थिक व्यवहार तर होत नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत इ रिक्षा या हात रिक्षा चालकांच्या ताब्यात दिल्या जात नाही तोपर्यंत सर्व हात रिक्षा आज दिनांक 8 मार्च पासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

        ""राज्य सरकारने मागणी केल्याप्रमाणे तीन महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला व तसा अहवाल सरकारने कोर्टाला सादर देखील केला आहे आणखी एक वर्ष ठेकेदारच चालविणार असल्याने हात रिक्षा चालकांची उपासमार होणार आहे (शकील पटेल अध्यक्ष - हात रिक्षा संघटना माथेरान)

        10 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने सनियंत्रण समितीला आदेश दिले आहे की या ई रिक्षा हात रिक्षा चालकांना देण्यात याव्यात फक्त या रिक्षाची मार्गिका कशाप्रकारे असावी या बाबत समितीने लक्ष केंद्रित करावे. कोर्टाच्या आदेशात असे कुठेही नमूद केलेले नाही की या ई रिक्षा ठेकेदाराला देण्यात याव्यात. परंतु ही समिती जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत असून आमच्या भावनांशी खेळत आहे.( रुपेश गायकवाड -हात रिक्षा चालक)

Post a Comment

0 Comments