Type Here to Get Search Results !

प्रदेश महिला आघाडी कडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.


 कर्जत...(प्रफुल जाधव) ; ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत रायगड जिल्हा व कर्जत तालुका प्रदेश महिला आघाडी व तालुक्यातील अन्य पदाधिकारी यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

      या वेळी अनेक महिलांनी यात सहभाग घेऊन आपली मते मांडली,आपले प्रश्न मांडले, आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, सर्व महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


एक सामान्य महिला जेव्हा पोलिस अधिकारी किंवा एखाद्या एशाच्या शिखरावर पोहचते तेव्हा ती खरी स्त्री शक्ती असते, पहिले तर पुरुष शक्ती पेक्षा स्त्री शक्तीचा जागर अधिक असतो, पूर्वी महिला ह्या घर आणि घरकाम करणातटच व्यस्त असायच्या परंतु आता ही परस्तीथी वेगाने बदलली आहे.

        आज महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.आज बघा आपली राष्ट्रपती देखील एक महीलच  द्रौपदी मुर्मु आहे.


        त्या मुळे महिलांना कोणीही कमी लेखू नये, महिला शक्ति, तीच दुर्गा, तीच काळी, तीच भवानी, आणि हे सगळ पाहता सध्याची परिस्थिती बदलली आहे.

         प्रत्येक उच्च पदावर महिला काम करत आहेत. तरी आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी तर्फे महिलांचा आरोग्य सेविका व अन्य महिला कर्मचारी, पोलिस महिला यांना गुलाब पुष्प गुच्छ देऊन जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगळे, जिल्हा युवा अध्यक्ष कु प्रफुल जाधव, ता. युवा अध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश महिला शितोळे मॅडम, सौ रेश्मा लोंगळे, वासंती शिंदे मॅडम, महिला ता प्राची जाधव, शेळके मॅडम, अन्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments