Type Here to Get Search Results !

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डिकसल गावात साजरी.......

 

कर्जत. प्रतिनिधी.... हिंदवी स्वराज्य संस्थापक. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीस त्रिवार मानाचा मुजरा.
         मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. जगातील १११ देशात १९ फेब्रुवारी जयंती साजरी केली जाते.१३०० पेक्षा जास्त शब्दांचा पहिला मराठी शब्द केश शिवरायांनी तयार केला. छत्रपती शिवाजी महाराज एक भूगर्भ शास्त्रज्ञ आज आपण शेतीत 300 फूट बोर करून घेऊ नये पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षानंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्यावर गेलो तर चार हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते. ती ही कुठलीही मोटर किंवा पाईपलाईन नसताना हे दिसतं. छत्रपती शिवराय स्वराज्य स्थापनेचा विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन लढले. स्वराज्यावरती आक्रमण करणारे ,फंद फितुरी करणारे, मग ते शत्रू असतील ,घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जाती धर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले. जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे त्याच्या दरबारी कधी स्त्री नर्तकी नाचली नाही. स्वतःसाठी मोठे मोठे महाल बांधले नाही. सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज "रयतेचे स्वराज्य" असाच शब्द वापरत.                            डिकसल गावामध्ये अती उस्तहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाखा प्रमुख श्री समीर साळोखे यांच्या हस्ते महाराजांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले, गावातील सर्व ज्येष्ठ आणि महिला व सागली तरुण पिढी यावेळी या उत्सवात सहभागी झाले होते.

           महाराज्यांच्या जयंती निमित्त डिकसल नाक्यावर मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली, त्याच प्रमाणे सायंकाळी महाराजांचा पालखी सोहळा, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावामधील सर्व तरुण मंडळी,नागरिक, महिला सहभागी झाले होते, गावातील सर्वांनी महाराजांचे पूजन केले. सगळी कडे आनंदाचं वातावरण निर्माण झाले, साधारणतः ९:३०मी मिरवणूक महाराजांची आरती करण्यात आली आणि शेवटी जयंती उत्सव ची सांगता करण्यात आली.... छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी.. जय शंभु राजे..

Post a Comment

0 Comments