प्रतिनिधी कर्जत (प्रफुल जाधव) : कर्जत तालुका राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजला जातो. 2021 मध्ये कर्जत येथील प्रशासकीय भावनांच्या भूमिपूजनापासून वाद निर्माण झाला, तर आमदार महेंद्र थोरवे यांनी तत्कालीन पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांना विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीत सुरुंग लागला.
राज्यात सत्ता बदल झाला असता राष्ट्रवादी कर्जत पवार गटाकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण येथील शिवसेनेच्या मेलाव्यात टीका करत "युतीचा धर्म तटकरे यांनी न पालल्यास त्यांचा कडेकोट केला जाईल."त्यामुळे दुसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक नेते रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत येथील जनसंपर्क कार्यालयात संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर निशाणा साधला व टीका केली. एक प्रकारे सूर्यावर थुंकनाऱ्यांची थुंकी ज्याप्रमाणे त्यांच्या अंगावर पडते असे वक्तव्य करत त्यांनी टीका केली. पहिल्याच प्रयत्नात अपघाताने आमदार झाले मात्र निवडून येऊन त्यांची आमदारकीची इच्छा पूर्ण झाली असल्याचे त्यांनी म्हटले.
कर्जत खालापूर विधान सभा मतदार संघात राष्ट्रवादी जर डोला ठेवणार असेल तर मी देखील बघून घेईल असे थोरवे म्हटले. आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत पुढचा आमदार कोणाचा करायचा हे कर्जत खालापूरची मायबाप जनता ठेवील असा टोला त्यांनी थोरवेना लगावला. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी आमदार थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी रायगड जिल्हा परिषद माझी उपाध्यक्ष श्री सुधाकर घारे, प्रदेश सरचिटणीस भरत भगत, अशोक मोपतराव, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे. कर्जत महिला अध्यक्षा रंजना धुले, कर्जत तालुका युवक अध्यक्ष एडवोकेट स्वप्निल पालकर, कर्जत शहराध्यक्ष भगवान भोईर, माथेरान शहराध्यक्ष अजय सावंत, अरुण हरपुडे, भूषण पेमारे आधी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments